नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) ७८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०६७, एकूण कोरोना रुग्ण:-४६,०९८, एकूण मृत्यू:-६६९ (आजचे मृत्यू ९), घरी सोडलेले रुग्ण :- ४०,९९६, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४४३३ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) फ्लॅट क्रमांक २,निरज रो हाऊस,पोलीस स्टेशन वसाहत समोर,वासन नगर पाथर्डी फाटा येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) जेलरोड, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) बी-१०, राज्य कर्मचारी वसाहत, अशोक नगर सातपूर येथील ७९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) दौलत नगर, नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) श्रमिकनगर, सातपुर, नाशिक येथील ४७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) टाकळी आगर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) रामवाडी, पंचवटी येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) हांडोरे चाळ, लॅम रोड,विहितगाव नाशिकरोड येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) पाण्याच्या टाकीजवळ, नवीन सामनगाव, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.