जिल्ह्यात आजपर्यंत ५७ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त ; ८ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू….

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.२४) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ५७  हजार ९८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ८  हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार २२५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४२५, चांदवड १३२, सिन्नर ५९०, दिंडोरी १५६, निफाड  ८५१, देवळा ५५,  नांदगांव २५१, येवला ६०, त्र्यंबकेश्वर ६७, सुरगाणा २५, पेठ २२, कळवण ६९,  बागलाण १६०, इगतपुरी १४३, मालेगांव ग्रामीण ३३४ असे एकूण ३ हजार ३४०  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ४३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६५  तर जिल्ह्याबाहेरील १०२ असे एकूण ८ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ६७  हजार ६५३  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७८.८९,  टक्के, नाशिक शहरात ८८.९३ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.७२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६८.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ३७९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ६६९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५०  व जिल्हा बाहेरील २७ अशा एकूण १ हजार २२५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी आज (दि.२४) सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790