नाशिक: गंगापूर धरणातून ३ हजार क्युसेक्स विसर्ग !

नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२५: शहर व परिसराची तहान भागविणारे गंगापूर धरण सोमवारी (दि.२५) ९८.५६ टक्के भरले. धरणात ५,५३२ दलघफू जलसाठा असून सोमवारी विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला दुपारी तीन वाजेनंतर १८८९ तर सायंकाळी सात वाजता थेट ३०२५ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली दिसून आली. पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर टिकून आहे. शहरात सायंकाळपर्यंत २.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790