नाशिक: दोन जणांसह शेळीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद !

नाशिक। दि. ६ जून २०२५: पाथर्डी परिसरातील पिंपळगाव खांब या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा परिसरात मुक्त संचार होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख; १० सप्टेंबरपासून ३०० हून अधिक पथकांची तपासणी मोहीम

वन विभागाने पिंजरा लावून त्यात कोंबड्यांचे सावज ठेवले. कोंबड्या खाण्यासाठी बिबट्या आला आणि बुधवारी पहाटे पिंजऱ्यात अडकला. पाथर्डी पंचक्रोशीतील पिंपळगाव खांब येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत होता. त्यांच्या शेतावरील मजुरावर शनिवारी (दि. ३१) दुपारच्या वेळी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने तो बचावला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790