Amazon

नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

नाशिक, दि. २५ सप्टेंबर २०२६: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान शहरातील रविवार पेठ आणि रविवार कारंजा परिसरातील दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकून तब्बल ६,६५९ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजे किंमत ७ लाख १२ हजार रुपये आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने रविवार पेठेतील मे. राजेश ट्रेडिंग कंपनी तसेच रविवार कारंजा येथील मे. गौतम ट्रेडिंग कंपनी येथे अचानक तपासणी केली.

तपासणीदरम्यान गुळाच्या साठ्याच्या दर्जाबाबत तसेच त्यामध्ये भेसळ असल्याचा संशय निर्माण झाला. प्राथमिक तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच संबंधित गूळ मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असल्याने संपूर्ण साठा तातडीने सील करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सहआयुक्त मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, गोपाल कासार, ऋतुजा नवले आणि श्रद्धा राहींज यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सणांच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करू नये. अन्नपदार्थांमध्ये भेसळ अथवा निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790