नाशिक: म्हाडाच्या फसवणूकप्रकरणी नायब तहसीलदारला अटक

नाशिक। दि. ४ मे २०२६: म्हाडा संदर्भातील फसवणूक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली आहे. शनिवारी (दि. २) रात्री गंगापूर रोड येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला 6 मे रोजी कुंभ उद्योग संगमसह डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट

या प्रकरणातील ४९ पैकी ३१ प्रकरणांत पाटील यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे शासनाची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेली २० टक्के जागा किंवा सदनिका देण्याची अट टाळण्यासाठी काही विकासकांनी भूखंडांचे कागदोपत्री विभाजन केल्याचेही उघड झाले आहे. यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे नकाशे आणि बनावट शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने ८४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

या प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यावर प्रथमच कारवाई करण्यात आली असून, रविवारी पाटील यांची सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. तसेच, या प्रकरणात भूमिअभिलेख विभागाची भूमिका काय होती, याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790