
नाशिक। दि. ४ मे २०२६: शहरात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. रविवारी (दि. ३) कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २१.२ अंशांवर नोंदवले गेले. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका तीव्र जाणवत असून, वाऱ्याचा वेग कायम असल्याने तापमान स्थिर राहिले.
दुपारी १२ ते ४ या कालावधीत शहरातील प्रमुख भागांमध्ये उष्णतेचा परिणाम स्पष्टपणे जाणवला. मुंबई नाका परिसरासह मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक, सारडा सर्कल, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ आणि रविवार कारंजा, मेहेर सिग्नल परिसरातही वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, एप्रिलच्या अखेरीस शहरातील तापमानाने उच्चांक गाठत ४१.५ अंशांपर्यंत झेप घेतली होती. सलग दोन दिवस पारा चाळिशीपार राहिल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर तापमानात काहीशी घट झाल्याने दिलासा मिळाला असला, तरी किमान तापमान वाढल्याने रात्री उकाडा असह्य होत असल्याची स्थिती आहे.
![]()

