HomeAd

नाशिक: पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने युवकाची २० लाखांची फसवणूक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पार्ट टाईम जॉब देण्याचा बनाव करून अज्ञात इसमांनी वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरण्यास सांगून एका तरुणाची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विशाल शिवनारायण गुप्ता (वय 27, रा. विद्या भवन, आर. टी. ओ. ऑफिसशेजारी, पेठ रोड, पंचवटी) हा सुशिक्षित तरुण ऑनलाईन साईटवर नोकरीचा शोध घेत होता. त्यादरम्यान, अज्ञात टेलिग्रामधारकाने गुप्ता याच्याशी संपर्क साधला.

👉 हे ही वाचा:  कर्मयोगी नगरमधील रस्त्याचा गायब झालेला निधी पुन्हा देणार; आयुक्तांचे ‘शिवसेना-सत्कार्य’ला आश्वासन

त्यावेळी अज्ञात भामट्याने वेगवेगळ्या टेलिग्राम ग्रुपमार्फत पार्ट टाईम जॉब देण्याचा बनाव करून फिर्यादी गुप्ता याला वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास लावले. त्यानंतर फिर्यादी गुप्ता याने 14 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये 20 लाख 17 हजार 474 रुपये जमा केले; मात्र अज्ञात भामट्याने या तरुणाला ठकविण्याच्या उद्देशाने खेोटे जॉब देऊन त्याची फसवणूक केली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. ३१ मे) दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार !

अज्ञात भामट्याने बँक खात्यात जमा झालेली 20 लाख 17 हजार रुपयांची रक्कम स्वीकारूनही पार्ट टाईम जॉब न देता फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790