नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण शनिवारी (दि. ३१) नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढले आहेत.
शहरातील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला देशभरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.३०) आणि शनिवारी (दि. ३१) असे दोन दिवस नाशिक मपालिका हद्द, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील दुकाने, तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


