LPG

नाशिक: पैसे दिले नाहीत म्हणून आईलाच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एका तरुणाने आईलाच लाकडाने मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  मार्चच्या अवघ्या १२ दिवसांतच नाशिकचा पारा ३८ अंशांपार; दशकातील पहिली नोंद

याप्रकरणी काजल संदीप आसरकर (वय 26, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, उंटवाडी रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे, की आरोपी प्रवीण परशुराम गालट (वय 28) याने त्याची आई जानकी परशुराम गालट (वय 45, दोघेही रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, उंटवाडी रोड, नाशिक) यांच्याकडे पैसे मागितले; मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आलेल्या आरोपी मुलाने आईला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली, तसेच “तुला आता सोडतच नाही, तुझा जीवच घेतो,” असे म्हणून लाकडाने मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोडाऊनमधील ४.५ लाखांच्या वायर चोरीचा उलगडा; दोघे जेरबंद !

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी प्रवीण गालट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790