नाशिक: पोलिस दलाकरीता 66 वाहनांच्या खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर

नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२६: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाचे बळकटीकरण करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक, नाशिक यांना एकूण ६६ वाहनांच्या खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ७ कोटी २२ लाख ३४ हजार ५६४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अभिनव भारत मंदिरातील विविध कामांसाठी अडीच कोटींची प्रशासकीय मान्यता

या निधीतून पोलिस आयुक्त, नाशिक यांच्याकरीता दहा वाहने, पोलिस आयुक्त नाशिक कार्यालयाकरीता १६ वाहनांची खरेदी करण्यात येईल. तर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्यासह ४० वाहनांची खरेदी करण्यात येईल.

नाशिक शहरासह जिल्ह्याचा चौफेर विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला सतर्क राहावे लागते. तसेच आगामी काळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर गस्त घालण्यासाठी पोलिस दलाला वाहनांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून वाहनांची उपलब्धता व्हावी, अशी मागणी पोलीस दलाने केली होती. त्यानुसार पालकमंत्री श्री. महाजन यांनी तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी वाहन खरेदीसाठी निधी उपलब्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत डीआरडीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू

या वाहनांवर मोबाईल सर्व्हिलन्स सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणार आहे. कॅमेरा निगराणी असल्याने त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग व आपत्कालिन परिस्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय या वाहनांवर पब्लिक ॲड्रेस सिस्टिम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस दलाच्या सक्षमीकरणास अधिक मदत होईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790