नाशिक। २१ ऑगस्ट २०२६: शहरामधील महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या महापारेषणच्या १३२/३३ केव्ही म्हसरूळ विद्युत उपकेंद्र येथून निघणाऱ्या सहदेवनगर आणि विद्या विकास या ११ केव्ही विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे विविध कामे करण्यात येणार असल्याने शनिवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत या वाहिनीवरील भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
👉 यामध्ये विद्या विकास विद्युत वाहिनीवरील गीतांजली कॉलनी, सौभाग्य नगर, केबीटी सर्कल, मामा मुंगी परिसर, विद्या विकास सर्कल, पाटील गल्ली नंबर ३ व ४ , वाघ गुरुजी शाळा व समोरील परिसर तसेच सहदेवनगर विद्युत वाहिनीवरील दत्त मंदिर चौक, सुयोजित गार्डन, सहदेव नगर ,आयचित नगर, साई चौक, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन कॉलनी, नक्षत्र कॉलनी, पूर्णवाद नगर, भाजीबाजार मार्केट, प्रसाद सर्कल व आजूबाजूचा परिसर याचा समावेश असेल.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
![]()


