नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक: अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना शनिवारी (दि.१०) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (दि.१६) पोलिस कोठडी सुनावली.
चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून रिक्षाचालक शंकर गाडगीळ (३५) यास आरोपी गणेश उर्फ सोनू दादाजी कांबळे (२५) महेंद्र दादाजी कांबळे (२७) यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाने गाडगीळ याच्या डोक्यात दंडुका मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अंबड चुंचाळे एमआयडीसी पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, उपनिरीक्षक गणेश मुगले, संदीप पवार, ज्ञानेश्वर सहाने, जनार्दन ढाकणे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, तपासाची चक्रे फिरवून त्वरित संशयित आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मयत शंकर यांच्या पत्नी अश्विनी उर्फ मोना शंकर गाडगीळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.