नाशिक: उड्डाणपुलावर दुचाकी कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात युवक ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डीफाटा येथून नाशिककडे उड्डाणपुलावरून भरधाव जाणाऱ्या दुचाकीचालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी कठड्यावर आदळली. या अपघातात दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला.

स्वप्निल शिवाजी ढोली (२६, रा, पाथर्डी फाटा) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. उड्डाणपुलावरून शनिवारी (दि.१०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विल्होळी येथून स्वप्निल हा नाशिककडे दुचाकीने जात होता. लेखानगर येथे त्याची दुचाकी संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790