नाशिक: तपोवनात झाडांसाठी आज (दि. २१) लाक्षणिक उपोषण

नाशिक। दि. २१ फेब्रुवारी २०२६: कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामसाठी तपोवनातील प्रस्तावित १७०० वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. ‘समस्त तपोवनप्रेमी नाशिककर’ यांच्या वतीने शनिवारी (दि. २१) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एकदिवसीय शांततामय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

या संदर्भात उद्यान विभाग व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर नागरिकांकडून लेखी मते मागविण्यात आली होती; मात्र आजपर्यंत त्यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही. तसेच आयुक्तांशी चर्चेनंतरही अंतिम निर्णय झालेला नसल्याने पर्यावरण संरक्षणासाठी हे आंदोलन होत आहे.

कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे सांगतानाच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790