नाशिक: तोतया पोलिसांकडून महिलेची सोन्याची पोत लंपास

नाशिक। दि. ११ एप्रिल २०२६: पोलिस असल्याचे भासवून एका महिलेची सोन्याची पोत हातचलाखीने चोरून नेल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे शहरात अशा फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

त्रिमूर्ती नगर येथील रहिवासी संगीता सुनील माळवे (वय ५८) या गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास श्री महादेव मंदिर येथे दर्शन करून राजराजेश्वरी चौकातून पायी घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर उभ्या असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवून स्वतःला पोलिस असल्याचे सांगितले.

पुढे तपासणी सुरू असल्याचे सांगत, गळ्यातील सोन्याची पोत काढून सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देत त्यांनी माळवे यांच्याकडील दागिना कागदात ठेवण्यास सांगितले. याच वेळी आरोपींनी हातचलाखी करत कागदाची अदलाबदल केली आणि सुमारे दीड तोळे वजनाची, अंदाजे ४६ ते ५० हजार रुपये किमतीची पोत लंपास केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

या घटनेनंतर अशा तोतया पोलिसांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने कळवण्याचे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790