नाशिक: एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या तिघांना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. ३१ मे २०२६ : आडगाव पोलिसांनी माडसांगवी टोलनाक्याजवळ केलेल्या कारवाईत चारचाकी वाहनातून मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाचा साठा जप्त केला असून या प्रकरणी तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. ३०) वीजपुरवठा बंद राहणार…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २९) पहाटे माडसांगवी टोलनाक्याजवळील पुलाखाली संशयितरीत्या उभ्या असलेल्या एमएच १५ जेएस ४५९७ क्रमांकाच्या कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून ६.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे; ३ दिवस पोलीस कोठडी

या प्रकरणात सुदाम मुरलीधर सोनवणे, विशाल दत्तात्रय शिंदे आणि विवेक नवनाथ खालकर यांना आरोपी करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान अमली पदार्थासह कार, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण २२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक व्ही. जे. पंचमुख पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790