नाशिक: अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे; ३ दिवस पोलीस कोठडी

नाशिक। दि. ३१ मे २०२६: मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरातील बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात आरोपी असलेल्या अशोक खरात याला सिन्नर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, जगदंबा माता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणातील आरोपी नामकर्ण आवारे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

जगदंबा माता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात याला यापूर्वी सिन्नर पोलिसांनी अटक केली होती. त्या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, मिरगाव येथील कथित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी त्याचा पुन्हा ताबा घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर, जनजीवन विस्कळीत

शुक्रवारी रात्री पोलिसांनी खरात याला कारागृहातून ताब्यात घेत सिन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण करीत आहेत.

दुसरीकडे, जगदंबा माता पतसंस्थेतील ३२ बनावट खात्यांच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. शनिवारी (दि. ३०) न्यायालयाने आवारे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790