Amazon

नाशिक: तीन गावठी कट्ट्यांसह तिघे ताब्यात; ३ जिवंत काडतुसेही जप्त

नाशिक। दि. २६ सप्टेंबर २०२६: शहरातील पंचवटी-मखमलाबाद रोडवरील घाडगे नगर परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या तीन संशयितांना गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री करण्यात आली. गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. तीन इसम घाडगे नगर, पंचवटी-मखमलाबाद रोड परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

🔎 हे वाचलं का?:  सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे ‘स्वर सावना’चा २६ सप्टेंबरला सांगीतिक कार्यक्रम

पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांनी तातडीने तीन स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांनी घाडगे नगर परिसरात संशयितांचा शोध सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, वडजाई माता नगरसमोरील मोकळ्या जागेत सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता प्रत्येकाच्या कमरेला एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

🔎 हे वाचलं का?:  मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे: किरण सुकलाल केवर (२६, रा. समर्थ नगर, हनुमानवाडी, पंचवटी), प्रणव गणेश वराडे (२०, रा. वडजाई माता नगर, पंचवटी) आणि कुणाल महेंद्र चव्हाण (१९, रा. क्रांतीनगर, गणेश चौक, मखमलाबाद रोड, पंचवटी) अशी आहेत.

या कारवाईत एकूण तीन गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदिप पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल आडके, हवालदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राहुल जगझाप, अंमलदार संदिप भुरे, गुरु गांगुर्डे, कल्पेश जाधव, अक्षय गांगुर्डे, घनश्याम महाले, राकेश राउत, दयानंद सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, महिला पोलीस अंमलदार सुनिता कवडे यांच्या पथकाने पार पाडली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790