नाशिक: कोयत्याने हल्ला, तोडफोड करणाऱ्या बेहनवाल टोळीचा केला ”कायद्याचा बालेकिल्ला” !

नाशिक। दि. २४ जूलै २०२६: जयभवानी रोड परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत माजविणाऱ्या आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या विजय ऊर्फ छंगा सरजीत बेहनवाल व त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून अटक केली. गुंडाविरोधी पथक आणि नाशिकरोड युनिटने संयुक्त कारवाई करत चौघांना जेरबंद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विजय ऊर्फ छंगा सरजीत बेहनवाल (२८), योगेश ऊर्फ काका प्रल्हाद आहेर (४३), प्रदीप ऊर्फ गणेश विठ्ठल काळे (२६) आणि सचिन ऊर्फ अन्नू राधेकिशन गवंडर (३२) यांचा समावेश आहे.

२० जुलैच्या रात्री उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी रोड येथे जुन्या वादातून पाच ते सहा जणांनी फिर्यादीच्या भावावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर आरोपींनी घरावरही कोयत्याने वार करत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच अनेक दुचाकींची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

घटनेनंतर आरोपी सिन्नरमधील एका कला केंद्रात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तेथे धाड टाकण्यापूर्वीच ते पसार झाले. तपासादरम्यान आरोपी सिन्नरहून पुण्याकडे जात असताना संगमनेर येथील एका बारमध्ये जाऊन बारमालकाला दमदाटी केल्याचेही समोर आले.

यानंतर आरोपी नारायणगाव येथील एका कला केंद्रात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. चारही बाजूंनी वेढा घालत चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिकमध्ये आणून पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790