नाशिक: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील युवती ठार; वडील जखमी

नाशिक। दि. २८ जून २०२५: भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवती ठार झाली. तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी ७ वाजता टाकळी मार्गावर हा अपघात घडला. ऋषिका आनंद चांदवले (वय: २३, राहणार: रामदास स्वामी नगर, टाकळी रोड, नाशिक) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पुढील आठवडाभर हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंद चांदवले हे मुलगी ऋषिका हिस दुचाकीवर पाठीमागे बसवून टाकळीमार्गे नाशिकरोडकडे जात असताना टाकळी मार्गावर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच १४ एचयू ८४०७) धडक दिली. यात ऋषिका खाली पडून जागीच ठार झाली तर तिचे वडील गंभीर जखमी झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी मुलगा, सून आणि मुलीसह चौघांवर गुन्हा

अपघातानंतर नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित मद्य प्राशन केलेला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790