नाशिक: भरधाव बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक जखमी

नाशिक | १७ जून २०२५: नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, अपघातानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

ही दुर्दैवी घटना उपनगर नाका येथे सोमवारी (१६ जून) दुपारी २.३० च्या सुमारास घडली. पाऊस सुरु असल्याने झाडाखाली थांबलेल्या तिघांना अर्नाळा येथून शिर्डीकडे जाणाऱ्या बसने भरधाव वेगात जोरदार धडक दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडक इतकी भीषण होती की, बसने धडक दिल्यानंतर बसच्या पुढील भागाचा मोठा आवाज झाला. लोकांनी धावत जाऊन जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला.

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

या भीषण धडकेत संतोष एकनाथ संसारे (वय ४८, रा. सुंदरबन कॉलनी, लेखानगर, सिडको) आणि रूपाली सचिन काळे (वय: ४२, रा. गोदावरी सोसायटी, नारायण बापू नगर, जेलरोड) यांचा मृत्यू झाला. रूपाली यांचे पती सचिन काळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

👉 हे ही वाचा:  राज्यातील मुसळधार पावसाने घेतली विश्रांती; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

अपघाताची माहिती मिळताच उपनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बसचा चालक शरद गणपत भोई याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790