नाशिक: मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

नाशिक। दि. ७ एप्रिल २०२६: मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ६५ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात सोमवारी (दि. ६) सकाळी मखमलाबाद रस्त्यावरील शांतीनगर परिसरात घडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

केशवराव जिवलाजी बागुल असे मृत व्यक्तीचे नाव असून ते समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले होते. शांतीनगर येथे वास्तव्यास असलेले बागुल सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. लीलावती रुग्णालयाजवळ पोहोचताच भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

या अपघातात बागुल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास म्हसरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बळवंत गावित करत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७६/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790