नाशिक: गेल्या १० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

नाशिक। दि. ६ मे २०२६: भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१६ पासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला अखेर गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली. सिडको परिसरातील दत्त चौक येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

गुन्हे शाखा युनिट-२चे अधिकारी आणि कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत असताना सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि पोलिस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. भद्रकाली पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार संशयित अनिल ऊर्फ गिन्या पिठेकर हा तोरणानगर येथील दत्त चौक मटन मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ती प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर...

त्यानुसार सहायक उपनिरीक्षक मनोहर शिंदे, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी तसेच अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांच्या पथकाने दत्त चौक परिसरात सापळा रचला. पथकाने अनिल ऊर्फ गिन्या पिठेकर (वय ३१, रा. इंदिरा गांधी वसाहत क्र. १, लेखानगर) याला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकच्या 'या' भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

चौकशीदरम्यान पिठेकरने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी त्याला भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, दुचाकी चोरीच्या इतर गुन्ह्यांबाबतही त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790