आषाढी एकादशीनिमित्त नाशिक विभागातून ३०० जादा एसटी बसेस; २० ते ३० जुलैदरम्यान विशेष नियोजन

नाशिक। दि. १६ जुलै २०२६: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी तसेच त्यानंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाकडून २० ते ३० जुलै या कालावधीत ३०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ही विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. पायी वारी करता न येणारे अनेक भाविक एसटी बससेवेचा पर्याय निवडतात. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील विविध आगारांतून पंढरपूरसाठी विशेष बसेस चालविण्यात येणार आहेत.

यंदाही किमान ४५ भाविकांचा गट असल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बस उपलब्ध करून देण्याची सुविधा एसटी महामंडळाने कायम ठेवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

यंदा शनिवार, २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, २२ ते २४ जुलै या कालावधीत सर्वाधिक जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

जादा बसेसचे नियोजन (दिनांकनिहाय):

  • २० जुलै – २४ बसेस
  • २१ जुलै – ६८ बसेस
  • २२ जुलै – १४५ बसेस
  • २३ जुलै – १३५ बसेस
  • २४ जुलै – १०५ बसेस
  • २५ जुलै – २४ बसेस
  • २६ जुलै – २५ बसेस
  • २७ जुलै – २५ बसेस
🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

एसटी प्रशासनाने भाविकांनी प्रवासाचे नियोजन आगाऊ करून अधिकृत आरक्षण सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790