नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने गजानन महाराजांचा १४६ वा प्रगट दिन यशवंतराव महाराज पटांगण, गंगाघाट येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रींना महाअभिषेक महाआरती होऊन दु. १ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता डॉ. हर्षदा संचेती, डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी तर दुपारी १:३० वा कर्नाटकी समाज महिला व दुर्गा देवी भजनी मंडळातर्फे भजन होईल.
सूर्यनमस्कार स्पर्धेत मराठा हायस्कूल, श्रीराम विद्यालय व लोकमान्य विद्यालय, मुलींमध्ये आठवले जोशी बाल विकास मंदिर मेरी, लोकमान्य विद्यालय पंचवटी, श्रीराम विद्यालय पंचवटी, पेठे विद्यालय, आदर्श सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांना गौरविण्यात येणार आहे.
दिंड्यांचा होणार गौरव:
श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवातील दिंड्यांमधील श्रीक्षेत्र धोडप किल्ला परिसर व सप्तशृंगी परिसर पायी दिंडी सोहळा चांदवड, श्रीक्षेत्र बाळेश्वर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा बाळेश्वर ता. संगमनेर, गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, खेडले ता. निफाड व ओम चैतन्य कानिफनाथ श्रीक्षेत्र मालदाड ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी मालदार ता. संगमनेर यांना आदर्श भूषणावह पर्यावरण पूरक दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे.