नाशिक: बेधुंद अवस्थेत कारच्या काचा फोडल्या; मद्यधुंद युवक CCTVत कैद

नाशिक (प्रतिनिधी): मंगळवारी (ता.१९) पहाटे अडीचच्या सुमारास चेतनानगर मध्ये सह्याद्री युवक मंडळाचे सचिव योगेश पाटील यांच्या कारच्या काचा अज्ञाताने फोडून नुकसान केल्याची घटना घडली.

श्री. पाटील यांनी आपली कार (एमएच- 15- डीएम- 3414) चेतना व्हिला इमारतीच्या पार्किंगमध्ये लावली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

पहाटे अडीचच्या सुमारास सीसीटीव्हीत मद्यधुंद युवक कैद झाला असून फरशीच्या तुकड्यांच्या साहाय्याने तो काच फोडताना दिसत आहे. त्यानंतर टपावर बसून त्याने गाडीचे नुकसान केले आहे. दरम्यान श्री. पाटील यांनी इंदिरानगर पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे.

गाड्यांचे नुकसान करण्याचे लोण चेतनानगरसारख्या शांतताप्रिय परिसरात पोचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक सिलिंडर झाले 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...

पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत संशयिताचा शोध घेण्याची मागणी सह्याद्री मंडळाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव, मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश विभूते, शैलेश कार्ले, अजय दहिया आदींनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790