news

नाशिक: चार हजार रुपयाची लाच घेतांना महिला जीएसटी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (प्रतिनिधी): दोन वर्षापासुन बंद असलेल्या कंपनीचा व्यवसायकर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जीएसटी महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

स्नेहल सुनिल ठाकुर (52, पद – व्यवसाय कर अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, क्रुषि औद्यागिक संघ लि., द्वारका, नाशिक.) रा. आश्विन हॉटेलजवळ, आश्विन संकुल रो हाऊस, आश्विन नगर, नाशिक) असे लाचखोर जीएसटी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : तापमानाचा पारा वाढला; वाऱ्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा

तक्रारदार यांची कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षापासुन बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी गेल्या 13 तारखेला व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज केला होता.

सदर व्यवसायकर रद्द करून द्यायचे मोदबल्याततील स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 5 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 4 हजार देण्याचे ठरले.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सायंकाळी व्यवसाय कर कार्यालयात सापळा रचला तक्रारदाराकडून लाचीची 4000 ची रक्कम स्वीकारल्यानंतर दबा धरून असलेल्या पथकाने श्रीमती ठाकूर यांना रंगेहात अटक केली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर आधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, शितल सूर्यवंशी, संतोष गांगुर्डे यांनी कामगिरी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790