Breaking: त्र्यंबकेश्वरवरून दर्शन करून परत जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; 30 जखमी

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Breaking: त्र्यंबकेश्वरवरून दर्शन करून परत जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; 30 जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यात खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुजरातचे भाविक त्रंबकेश्वर होऊन दर्शन घेऊन परत जात असताना या बसला अपघात झाला आहे.

या अपघातात सुमारे 30  भाविक जखमी असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

दरम्यान ,गुजरात मधील काही भाविक एका खाजगी बसने त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना गुजरातला जोडल्या जाणाऱ्या खरपडी घाटात बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोकाची कारवाई

नाशिकमध्ये जॉब शोधताय ? इथे क्लिक करा !

या बस मध्ये 58 ते 60 प्रवासी होते तर त्यापैकी  जवळपास 30 भाविक जखमी आहे. जखमींना नाशिकच्या  जिल्हा शासकीय  रुग्णालयात उपचारासाठी करिता दाखल करण्यात आले आहे.

नाशिक: टायर जाळायला गेले अन् पोलिस चौकीच पेटवून बसले; मद्यपींचा पहाटेचा प्रताप

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

त्र्यंबकेश्वर गुजरात मार्गावर असणाऱ्या हरसुल जवळील खरपडी घाटात गुजरातच्या भाविकांची बस  चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली असून बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

दरम्यान बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची देखील माहिती काही जखमी कडून देण्यात आली  अपघात स्थळावर काही स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790