आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार.. धक्कादायक सत्य उघडकीस..

आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार.. धक्कादायक सत्य उघडकीस..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात काम करणारी एका व्यक्ती पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आली असता चार अनोळखी लोकांनी त्यांचे ब’ळ’ज’ब’रीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असता. मात्र पंचवटी पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले.

पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 281 /2021 कलम 365, 34 भा.दं.वि या गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती संजीव वैद्य, (वय 44, राहणार आसाराम बापू आश्रम गंगापूर रोड,नाशिक) हे दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आले असता, चार अनोळखी लोकांनी त्यांचे ब’ळज’ब’रीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशाने आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 अमोल तांबे व सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि रोहित केदार यांना आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले.

त्यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच पथकासह भेट देऊन सदर गुन्ह्यातील येणार्‍या जाणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदर सीसीटीव्ही मध्ये चार इसम इनोवा क्रिस्टा गाडीतून घेऊन जात असल्याचे  दिसून आले. या गाडीचा शोध घेण्याकरता पोलीस निरीक्षक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम बनवून सदर इनोवा क्रिस्टा गाडीचा शोध घेण्याकरता घोटी टोल नाका तसेच शिंदे पळसे टोल नाका या ठिकाणी जाऊन सदर ईनोवा गाडीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याचप्रमाणे CDR  Analysis सुद्धा करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

तपासादरम्यान सदर कि’ड’नॅ’प व्यक्ती, गुजरात राज्य अहमदाबाद येथील हाफ म’र्ड’र केस मध्ये बारा वर्षापासून फरार होती. त्याला अहमदाबाद क्राईम ब्रँचचे पोलीस हे नाशिकला आले व सदर इसमास अहमदाबादला घेऊन गेले अशी माहिती मिळाली.. या घटनेबाबत खात्री करण्याकरता गुजरात अहमदाबाद क्राइम ब्रांच पोलीस निरीक्षक देसाई यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता, त्यांनी तो त्यांच्याकडील साबरमती पोस्टे गुरनं 426/2009 भादवी 307,120(ब) प्रमाणे दाखल गुन्ह्यात 12 वर्षे पासून फरार असल्याचे सांगितले. संजीव वैद्य यालात्यांच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले असल्याचे सांगितले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

तरी पंचवटी पोलिस ठाण्याचे पोनि अशोक साखरे ,सपोनि सत्यवान पवार, गुन्हे शोध पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी रोहित केदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर अतिसंवेदनशील गुन्ह्याचा गुन्हा घडल्यापासून तपास करून गुन्ह्यातील नेमका प्रकार उघडकिस आणला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
👉 नाशिकरोडला प्रवाशाला लुटणारा ‘तो’ रिक्षाचालक व त्याचा साथीदार अटकेत..रिक्षाही जप्त..
👉 नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
👉 मॉर्निंग वॉकला जाताना अपघात; पुत्रासमोर पिता ठार

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790