Amazon

नाशिक: त्र्यंबकेश्वरला १२ ऑक्टोबरपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन बंद

नाशिक। दि. ५ ऑक्टोबर २०२६: पितृपक्षानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान मंदिरातील सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

पितृपक्षाच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. पितृकर्मासह विविध धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी आणखी वाढली असून मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बंद मनपा शाळांचे पुनरुज्जीवन करून विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर द्यावा- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी दीर्घकाळ रांगेत प्रतीक्षा करावी लागू नये आणि दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत ठेवता यावी, यासाठी ट्रस्टने व्हीआयपी दर्शन तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरात दररोज सुमारे २०० भाविक व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतात. या दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790