Amazon

नाशिक: एससी, एसटी प्रवगातील युवक- युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

नाशिक। दि. २८ सप्टेंबर २०२६: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), नाशिक व जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक पुरस्कृत अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) युवक- युवतींसाठी नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. त्यkसाठी मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुलाखती होतील, तर प्रत्यक्ष प्रशिक्षण ३० सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल, अशी माहिती एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी आरती शेलोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

या प्रशिक्षणांतर्गत दुचाकी दुरुस्तीचा अभ्यासक्रम आदर्श एज्युकेशन, कळवण, जि. नाशिक येथे, तर गृहोपयोगी वस्तू दुरुस्तीचा प्रशिक्षण वर्ग आयकॉन टेक्निकल इन्स्टिट्यूट, द्वारका, नाशिक येथे सकाळी ११ वाजता सुरू होईल.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना तांत्रिक कौशल्यासोबत उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती, शासकीय योजना, कर्ज व अर्थसाहाय्याच्या सुविधा, उद्योग नोंदणी तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त चेतन पाटील, एमसीईडीचे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, प्रकल्प अधिकारी श्रीमती शेलोरकर करतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790