Amazon

नाशिक: दस्त नोंदणीसाठी १० हजारांची लाच मागणारा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक। दि. २६ सप्टेंबर २०२६: दस्त नोंदणी करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यातील ४ हजार २०० रुपये खासगी दलालामार्फत स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. २४) द्वारका परिसरातील कांदा-बटाटा भवन येथे करण्यात आली. या प्रकरणात खासगी इसमालाही घेण्यात आले आहे.

दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ४ मधील संशयित दुय्यम निबंधक प्रमोद लक्ष्मण वामन (वय ५७, रा. नाशिकरोड) आणि खासगी इसम योगेश बाळू डांगले (वय ३८, रा. पिंपळस रामाचे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 10 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

तक्रारदार हे वकील असून त्यांच्या पक्षकाराच्या शेतजमिनीच्या दस्ताची नोंदणी करण्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केली होती. त्यावेळी संशयित प्रमोद वामन यांनी दस्त नोंदणी करून देण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या आदेशाने सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक विकास लोंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कांदा-बटाटा भवन परिसरात कारवाई केली. यावेळी वामन यांच्या सांगण्यावरून खासगी इसम योगेश डांगले याने पंचांसमक्ष ४ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने डांगले याला रंगेहात पकडले. त्यानंतर दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांनाही ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे ‘स्वर सावना’चा २६ सप्टेंबरला सांगीतिक कार्यक्रम

या प्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस अंमलदार किरण धुळे, सुरेश चव्हाण तसेच नितीन नेटारे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790