Amazon

नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक। दि. २४ सप्टेंबर २०२६: उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये संभाव्य रिक्त जागांवर मुलींसाठी शासकीय मातोश्री मुलींचे वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  सप्टेंबरमध्येच नाशिककरांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; पाणीटंचाईचे सावट

त्यानुषंगाने वसतिगृह प्रवेशासाठी ७ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक गणेश वळवी यांनी केले आहे.

इच्छुक विद्यार्थिनींनी प्रवेश अर्ज प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत. प्रवेशाची जाहिरात https://preiasnashik.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शासकीय मातोश्री मुलींचे वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक येथे संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790