Amazon

नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या ‘या’ विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल…

नाशिक। दि. २४ सप्टेंबर २०२६: शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूकसह नाशिकरोड, सिडको, आनंदवल्ली भागातसुद्धा लहान मोठ्या विसर्जन मिरवणूका काढण्यात येणार असल्याने शुक्रवारी (दि.२५) सकाळपासूनच वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. याबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने नियोजन केले असून अधिसूचना जारी केली आहे.

⚠️ नाशिकरोड, देवळाली कॅम्प, वडनेर विभाग:
👉 या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद (सकाळी १० वाजेपासून)- बिटको चौक (पुणे महामार्ग) देवी चौक, रेल्वे स्टेशन चौक, सुभाष रोड, देवळालीगाव, गांधीपुतळा, वालदेवी नदीकाठपर्यंत.
👉 नांदुरनाका (जेल रोड) पर्यंतचा रस्ता दुतर्फा दुपारी १२ वाजेपासून बंद राहणार.-नांदुरनाका (जेलरोड) पर्यंतचा रस्ता दुतर्फा दुपारी १२ वाजेपासून बंद राहणार.
👉 विहितगाव-वडनेर रोड-पाथर्डी गाव सर्कल-पाथर्डी फाट्यापर्यंत ये-जा करणारी जड, अवजड वाहने पुर्णपणे बंद राहणार.
👉 देवळाली कॅम्प-संसरीगाव मार्गावरील झेंडा चौक ते जामा मशिद-जुने बसस्टॅण्ड-सिलेक्शन कॉर्नर-संसरीनाका, दारणा नदीकाठपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

⤴️ नाशिकरोडमधील पर्यायी मार्ग:
👉 सिन्नरकडे जाणाऱ्या एस.टी बस, सिटीलिंक बस अन्य वाहने दत्तमंदिर सिग्नल येथून वीर सावरकर उड्डाणपूलावरून पुढे ये-जा करतील. कोणतेही वाहन पूलाखालून जाणार किंवा येणार नाही.
👉 संसरी गाव मार्गावरील झेंडा 3 चौक ते जामा मशिद, भगूरकडे जाणाऱ्या सिटी लिंक बस व अन्य वाहने जेतवननगर येथून जय भवानीरोडने रोकडोबावाडीमार्गे नदीकाठाने वडनेर रोड येथून संसरी गाव मार्गावरील झेंडा चौक ते जामा मशिदकडे जातील व येतील.
👉 सिन्नरकडून नाशिकरोडकडे नांदुरनाका (जेल रोड) पर्यंतचा रस्ता दुतर्फा दुपारी १२ वाजेपासून बंद राहणार. याकडे वाहने येणार नाहीत. वाय जंक्शन पॉइंटवर पोलिस बॅरेकेडिंग असणार आहे. तेथून वाहतूक डायव्हर्शन पाइंट.
👉 जड, अवजड वाहने पाथर्डगाव सर्कलकडून डावीकडे वळण घेत इंदिरानगरच्यादिशेने येतील. कलानगरपासून साईनाथनगरपर्यंत जाऊन पुन्हा वळण घेत पुढे वडाळा चौफुली येथून पुढे रविशंकर मार्गाने विजयममता सिग्नलकडे मार्गस्थ होतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

⚠️ शहरातील मुख्य मिरवणूक:
🚫 या मार्गावर वाहनांना बंदी: अशोकस्तंभ-अशोकस्तंभ – रविवार कारंजा-पंचवटी कारंजापासून पुढे दिंडोरीनाक्यापर्यंत दुतर्फा प्रवेश बंद.
👉 गोदापार्क रामवाडी ते अशोकस्तंभ (घारपुरे घाट पूल) दुतर्फा वाहनांना बंदी.
👉 मॅरेथॉन चौक-अशोकस्तंभ(गंगापुररोड) दुतर्फा बंद.
👉 गणेशवाडी रस्ता दुतर्फा बंद.-गणेशवाडी रस्ता दुतर्फा बंद.
👉 शहीद अब्दुल हमीद चौकापर्यंतचा (दूधबाजार) रस्ता. – शहीद अब्दुल हमीद चौकापर्यंतचा (दुधबाजार) रस्ता.
👉 सारडा सर्कल-दुधबाजारपर्यंतचा (फाळकेरोड) रस्ता.
👉 रेडक्रॉस सिग्नल आणि शिवाजी रोड गाडगे महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता.-रेडक्रॉस सिग्नल आणि शिवाजीरोड गाडगे महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता.

🚫 येथून वाहनांना ‘नो-एन्ट्री’- (सकाळी १० वाजेपासून):
सिडको, अंबड, आनंदवल्ली विभाग:
👉 आयटीआय पूल (सातपूर) गाढवे पेट्रोलपंप (दत्तमंदिर चौक) पर्यंत सर्व वाहनांना दुतर्फा प्रवेश बंद.
👉 चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्रपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहनांसाठी बंद.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

⤴️ शहरातील पर्यायी मार्ग:
👉 सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहने थेट टिळकवाडी सिग्नल शरणपुररोडने कॅनडा कॉर्नरमार्गे जुना गंगापुरनाका येथून हनुमानवाडी पुलावरून पुढे जातील.
👉 सीबीएसकडून मुंबईनाका/नाशिकरोडकडे ये-जा करणारी वाहने त्र्यंबकनाका-गडकरी चौक, मुंबईनाका सर्कलवरून भाभानगरमार्गे वडाळा नागजी सिग्नल येथून काठेगल्ली सिग्नलकडे जातील.
👉 सीबीएसकडून द्वारका, आडगावकडे जाणारी व येणारी वाहतूक गडकरी चौकातून मुंबईनाकामार्गे वळण घेत उड्डाणपूलाखालून वडाळानाका, द्वारका सर्कल ओलांडून पुढे जातील.
👉 पेठ, दिंडोरी, ओझरकडून शहरात येणारी वाहने तथा एसटी बस व अन्य वाहने आडगावनाका कन्नमवार पूलावरून द्वारका सर्कलकडून नाशिकरोड व नाशिक शहरात पुढे मुंबईनाकामार्गे जातील.

⤴️ सिडकोतील पर्यायी मार्ग:
👉 त्रिमूर्ती चौक-मोगलनगर-सिटू भवन-आयटीआयपूलमार्गे वाहने ये-जा करतील.
👉 चांदशी गावाकडून इतरत्र जाणारी सर्व वाहने आनंदवलीकडे न जाता चांदशी गावातून नाशिक डावा तट कालव्याच्या रस्त्याने गंधारवाडी, मखमलाबादरोडने पुढे मेरी, म्हसरूळ, गंगापुररोड, जुनागंगापुरनाका, पंपिंग स्टेशनरोडकडे जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790