Amazon

नाशिक: घराची किल्ली न सापडल्याच्या कारणावरून १९ वर्षीय पत्नीची हत्या; २१ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा

नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२६ : घराची किल्ली सापडत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २१ वर्षीय पतीने १९ वर्षीय पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना बजरंगवाडी परिसरात घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित पती इद्रीस मोहम्मद शेख (२१) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

पोलिस अंमलदार राजू शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बजरंगवाडी येथे राहणारी जीना उर्फ नन्नी इद्रीस शेख ही पतीसोबत वडाळा गाव येथे गेली होती. तेथे घराच्या परिसरातच दोघांमध्ये वाद झाला. यावेळी इद्रीसने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

या प्रकारानंतर माहेरच्या नातेवाइकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी इद्रीसने मध्यस्थी करणाऱ्यांना धमकी दिल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दोघेही बजरंगवाडी येथील घरी परतले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

सोमवारी रात्री घराची किल्ली सापडत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून इद्रीसने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यावेळी जीना हिच्या नाकातून, तोंडातून तसेच डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून तिला पतीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संशयित इद्रीस शेख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790