Amazon

नाशिक: मार्केट यार्डातील दुकानावर FDAचा छापा; ३ लाखांचा जप्त

नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२६: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त तसेच मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान पेठ रोड वरील मार्केट यार्डातील एका दुकानावर कारवाई करत सुमारे ३ लाख १ हजार ९०० रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी अन्नपदार्थांचे नमुने घेण्यासोबतच त्यांची साठवणूक, उत्पादन व विक्रीची पद्धत तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

पंचवटीतील शरदचंद्र मार्केटमधील मे. श्री बालाजी फ्रुट ट्रेडर्स, दुकान क्रमांक ६७ येथे तपासणी करण्यात आली. यावेळी ५६ हजार २०० रुपये किमतीचे ७५ किलो वातुला ब्रेडचे गाईचे तूप आणि २ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीची ९०० किलो हळद पावडर असा एकूण ३ लाख १ हजार ९०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

दोन्ही अन्नपदार्थांचा दर्जा संशयास्पद आढळल्याने तसेच त्यांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा साठा ताब्यात घेतला. पुढील तपासणीसाठी संबंधित अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790