नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२६: वाहन प्रणालीतील बदल संपूर्ण देशात लागू केले असून वाहन मालकांनी वाहन विषयक सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांचे आधारकार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावा. त्यानंतरच वाहन हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या पत्रानुसार देशातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाइन परिवहन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणीच्या अनुषंगाने ट्रान्स्फर ऑफ ओनरशीप (Transfer Of Ownership, TO) व नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (No Objection Certificate, NOC) या सेवांसाठी सुधारित कार्यप्रवाह निश्चित करण्यात आला आहे. या कार्यप्रवासह सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता प्राप्त असून त्यानुसार या सेवांची सुधारित पद्धतीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रस्ता की मृत्यूचा सापळा? सातपूर-अंबड लिंकरोडवर चिखलामुळे दुचाकी घसरली, एकाचा मृत्यू

त्यानुसार वरील दोन्ही सेवांचा सुधारित व प्रमाणित कार्यप्रवाहानुसार निपटारा करण्यात यावा. वाहन नोंदणी प्रमाणपत्रामधील नाव व आधारकार्डवरील नावामध्ये तफावत आढळल्यास संबंधित वाहन मालकास please visit aadhar center to update the Pin Code or Visit RTO/apply using mobil authentication to avail contactless services. Name is not matching in vahan and aadhar असा संदेश वाहन प्रणालीमध्ये येतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

या पार्श्वभूमीवर वाहन मालकांनी आधारकार्डवरील नाव नोंदणी प्रमाणपत्रामधील नावाप्रमाणे दुरुस्त करून घ्यावे. ही तफावत दूर झाल्यानंतर वाहन ४.० प्रणालीमध्ये आवश्यक दुरुस्ती करून आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790