नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

नाशिक। दि. १५ ऑगस्ट २०२६: भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्रावणातील सोमवार व शनिवार कपालेश्वर मंदिर व रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डाॅ. जयकुमार आडे, उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सीमा अहिरे, शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, रवींद्र भारदे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तहसिलदार पंकज पवार, प्रदीप कर्पे, अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबई नाका आता स्वतंत्र ट्रॅफिक युनिट; आज (दि. १५) पासून कार्यान्वित

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेच्या नूतनीकरण दालनाचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790