नाशिक। दि. १५ ऑगस्ट २०२६: पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्यासह शहर पोलिस आयुक्तालयातील एकूण ४८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत.
पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाने स्वातंत्र्यदिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्तांमध्ये पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या विविध पदांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षकांमध्ये अंचल मुदगल, युवराज पत्की, जगवेंद्रसिंग राजपूत, अंकुश चिंतामण, अशोक शरमाळे आणि रणजित नलावडे यांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांना पुरस्कार:
हेमंत तोडकर, संदीप पवार, सलीम काझी, ज्ञानदेव राणे, विजय लबडे, शेखर फरतळे, शिवदास कुमावत, संदीप पवार आणि चेतन श्रीवंत, सहायक पोलिस उपनिरीक्षकांमध्ये विजय संतू लाभाडे, शेखर दशरथ फरताळे, शेरखान दिलावरखान पठाण, काशीनाथ महादेव गुरव, शरद जनार्दन सोनवणे, सुनील बहारवळ आणि नंदकुमार नांदुर्डीकर.
पुरस्कारार्थी हेड कॉन्स्टेबल:
हेड कॉन्स्टेबल पदावरील पुरस्कारप्राप्तांमध्ये नदीम खान पठाण, सचिन काळे, अविनाश देवरे, जितेंद्र परदेशी, घनश्याम पाटील, मुकुंद महाजन, किशोर ठाकूर, मनोज पाटील, गिरीश महाले, सचिन जाधव, विशाल काटे, गणेश फड, चंद्रकांत जगदाळे, संतोष उशीर, प्रशांत मरकड, मधुकर मुरकुटे, योगेश रेवगाडे, गणेश खोडे, विशाल देवरे, दीपक निकम, जनार्धन जाधव यांचा समावेश आहे.
![]()


