नाशिक: मुंबई नाका आता स्वतंत्र ट्रॅफिक युनिट; आज (दि. १५) पासून कार्यान्वित

नाशिक। दि. १५ ऑगस्ट २०२६: द्वारका सर्कल येथील भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने शहरात येणारी वाहतूक वडाळा आणि मुंबई नाका मार्गे वळत आहे. परिणामी वडाळानाका आणि मुंबईनाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन वाहतुकीचे प्रभावी नियमन करण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी मुंबईनाका येथे स्वतंत्र ट्रॅफिक युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्रावणातील सोमवार व शनिवार कपालेश्वर मंदिर व रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

द्वारका परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी यापूर्वी स्वतंत्र ट्रॅफिक युनिटची स्थापना करण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीचे योग्य नियमन करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र ‘मुंबई नाका ट्रॅफिक युनिट’ स्थापन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर याबाबतचे आदेश काढण्यात आले असून, हे युनिट १५ ऑगस्ट २०२६ पासून कार्यान्वित झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेशोत्सव २०२६ ठरणार महासिंहस्थ जनजागृतीचे व्यासपीठ; कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘गणेश मंडळ स्पर्धेचा' प्रस्ताव

या युनिटसाठी १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, ३ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि ६५ वाहतूक पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.

या युनिटमार्फत परिसरात दोन शिफ्टमध्ये वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. मुंबईनाका वाहतूक युनिटमध्ये पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार आणि पोलीस उपनिरीक्षक दिव्या बरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ज्वेलर्स दुकान फोडणारे दोन सराईत चोरटे जेरबंद; १३.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबईनाका येथे स्वतंत्र वाहतूक युनिट कार्यान्वित झाल्यामुळे या परिसरातील वाहतुकीचे अधिक प्रभावी नियोजन होण्यास मदत होणार असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच वाहनांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी या युनिटची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790