SIR: नाशिक पूर्वसह चार मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दोन दिवस विशेष शिबिर

नाशिक। दि. ८ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदारांचे गणना अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी नाशिक शहरातील 123-नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य, 125-नाशिक पश्चिम, 126-देवळाली मतदारसंघांमध्ये 8 व 9 ऑगस्ट 2026 (शनिवार व रविवार) या कालावधीत सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  अपोलो हॉस्पिटल्स नाशिक येथे जन्मजात हृदयविकार मोफत निदान व उपचार शिबिर

या शिबिरांत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक दिवसभर आपल्या मतदान केंद्रावर उपस्थितत राहून मतदारांना मार्गदर्शन करतील. ऑनलाइन सुविधा वापरणे शक्य असलेल्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Fill Enumeration form या पर्यायावर क्लिक करावे.

त्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर किंवा एपिक क्रमांक आणि कॅप्चा टाकावा. त्यानंतर प्राप्त ओटीपी भरुन लॉगीन करावे. आपल्या राज्याचे नाव व EPIC कार्ड क्रमांक टाकून सर्च करावे आणि गणना पत्रक तपासून submit करावे. घरबसल्या Self Enumeration करून आपला Enumeration Form भरावा. तसेच कुटुंबातील तरुणांनी व तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या सदस्यांच्या इतर कुटुंबीयांनाही ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावी.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ साठी स्वच्छतेचा सर्वसमावेशक आराखडा; तांत्रिक समितीच्या महत्त्वपूर्ण शिफारशी

ज्या मतदारांना Self Enumeration करणे शक्य नसेल त्यांनी 8 व 9 ऑगस्ट 2026 रोजीच्या विशेष शिबिरादरम्यान मतदान केंद्रावर जाऊन बीएलओ यांच्या मदतीने Enumeration Form भरावा. मतदान केंद्रावर येताना शक्यतो मतदार ओळखपत्र (EPIC) तसेच आवश्यक माहिती व कागदपत्रे सोबत आणावीत. सन 2002 च्या मतदार यादीतील माहिती ECINET App द्वारेही शोधता येते.

जिल्ह्यातील अनेक मतदार दिवसभर घराबाहेर असणे, बंद घरे अथवा बदललेले पत्ते यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. बीएलओ आपल्या घरी येण्याची वाट न पाहता शक्य असल्यास सेल्फ एन्युमरेशन (Self Enumeration) करावे किंवा विशेष शिबिरात सहभागी होऊन अर्ज भरून द्यावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्जाचे नूतनीकरण करण्याचे आवाहन

संबंधित मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित नसल्यास हेल्प डेस्क क्रमांकावर (०२५३- २३१०५२३) संपर्क साधावा. तसेच तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, Booth Level Agents (BLA), सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, युवक व स्वयंसेवी संस्थांनी मतदारांना सहकार्य करून एसआयआर मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन श्रीमती सरदेसाई यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790