नाशिक शहरातील ‘या’ विविध भागांत शनिवारी (दि. 8 ऑगस्ट) वीजपुरवठा बंद राहणार !

नाशिक। दि. ७ ऑगस्ट २०२६: महावितरणतर्फे नियोजित देखभाल व दुरुस्तीची विविध कामे करण्यात येणार असल्याने शनिवार (दि. ८ ऑगस्ट) रोजी नाशिक शहरातील विविध भागांमध्ये नियोजित वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहर विभाग १ अंतर्गत तसेच ३३ केव्ही क्रीडा संकुल उपकेंद्र परिसरातील कामांमुळे वेगवेगळ्या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन...

👉 ३३/११ केव्ही कॅम्पस विद्युत उपकेंद्र येथून निघणाऱ्या सिटी-१ आणि सिटी-३ या ११ केव्ही विद्युत वाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित भागांचा वीजपुरवठा बंद राहील.

👉 सिटी-१ वाहिनीवरील विकास कॉलनी, सत्त्या कॉलनी, उद्योग भवन, लवटे नगर, उंटवाडी, उत्कर्ष नगर, पोलीस प्रशिक्षण केंद्र, न्यायाधीश निवास, दल्युभाई पटेल कॉलनी, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, त्र्यंबक रोड व देनालक्ष्मी कॉलनी परिसराचा यात समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 18 सप्टेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

👉 तसेच सिटी-३ वाहिनीवरील महात्मा नगर, समर्थ नगर, पारिजात नगर, भोसला स्कूल परिसर, सावरकर नगर, शंकर नगर आणि निर्मल कॉलनी या भागांतील वीजपुरवठाही या कालावधीत बंद राहणार आहे.

👉 याशिवाय ३३ केव्ही क्रीडा संकुल उपकेंद्र अंतर्गत विविध कामे करण्यात येणार असल्याने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साईनगर, एकदंत आणि क्रीडा संकुल या ११ केव्ही वाहिन्यांवरील भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

देखभाल व दुरुस्तीची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल. तसेच कामास अधिक वेळ लागल्यास त्यानुसार वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790