अपोलो हॉस्पिटल्स नाशिक येथे जन्मजात हृदयविकार मोफत निदान व उपचार शिबिर

नाशिक। दि. ०७ ऑगस्ट २०२६: अपोलो हॉस्पिटल्स नाशिक व मुख्यमंत्री वैज्ञकीय सहाय्यता कक्ष तर्फे बालकांमधील जन्मजात हृदयविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. अनेक वेळी जन्मजात हृदयविकाराची लक्षणे सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाहीत. मात्र वेळेत निदान व योग्य उपचार मिळाल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी होऊ शकते.

या अभियानाअंतर्गत पालकांना पुढील लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दूध पिताना दम लागणे, बाळाची नैसर्गिक वाढ व वजन न वाढणे, वारंवार सर्दी, खोकला किंवा न्यूमोनिया होणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसून आल्यास त्वरित बाल हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे अपोलो हॉस्पिटल्स द्वारे सांगण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 ऑगस्ट रोजी आयोजन

हृदयातील कप्प्यांमध्ये जन्मजात क्षिद्र असल्याने शुद्ध व अशुद्ध रक्त एकत्र होऊन हृदय व फुफुसांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो यामुळे वरील लक्षणे दिसून येतात त्याला वैद्यकीय भाषेत ASD (Atrial Septal Defect), VSD (Ventricular Septal Defect), PDA (Patent Ductus Arteriosus) म्हणतात तसेच टेट्रोलॉजी ऑफ फॉलआउट (TOF ) म्हणजे ४ प्रकाराचे हृदयदोष एकच वेळी असणे ह्या गुंतागुंतीच्या आजाराची तपासणी या सदर शिबिरात होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदारांनी ८ व ९ ऑगस्टच्या विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

पात्र रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व CSR उपक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा उपलब्ध असणार आहे. या शिबिरात अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे अनुभवी तज्ज्ञ डॉ. संतोष वाडीले (Consultant Pediatric Interventional Cardiologist), डॉ. अजहर सय्यद (Consultant Cardiovascular & Thoracic Surgeon) आणि डॉ. भूषण टिळे (Consultant Interventional Cardiologist) रुग्णांची तपासणी करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  SIR: नाशिककरांनो लक्ष द्या... मतदार गणना अर्ज भरण्याची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढली !

“जन्मजात हृदयविकाराचे वेळेत निदान झाल्यास यशस्वी उपचार शक्य आहेत. त्यामुळे पालकांनी कोणतीही लक्षणे दुर्लक्षित न करता उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी इच्छुकांनी 8956931872 व अपोलो हॉस्पिटल्स, स्वामीनारायण नगर, आडगाव नाका, पंचवटी, नाशिक येथे संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790