नाशिक: भाजीपाला महागला, टोमॅटो मात्र स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

नाशिक। दि. २२ जुलै २०२६: जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा मोठा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. पिकांचे नुकसान आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुमारे ७० टक्क्यांनी घटल्याने बहुतांश भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मात्र, याच काळात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेला टोमॅटो आता २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतवारीनुसार टोमॅटोला २ ते २० रुपये प्रतिकिलो दर मिळत असून, कमाल भाव १,००० रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नेटबँकिंग सुरू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला ८.०८ लाखांचा गंडा; जीवे मारण्याची धमकी

दुसरीकडे, सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने भेंडी, कारले, घेवडा, दोडका, गिलके आणि गवार यांसारख्या भाज्यांचे दर ८० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकघराचे बजेटही कोलमडले आहे.

पालेभाज्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. सततच्या ओलाव्यामुळे पालेभाज्या लवकर खराब होत असल्याने बाजारातील आवक मर्यादित राहिली आहे. विशेषतः कोथिंबिरीच्या दरात मोठी वाढ झाली असून, बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून शेकडा २५० ते २८५ रुपये दर कायम आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी मानोरी येथील शैक्षणिक संस्थेची जागा थेट खरेदीद्वारे संपादित

बाजार समितीच्या माहितीनुसार, कोथिंबिरीच्या ३७६ शेकडा जुड्या, मेथीच्या ५४ शेकडा, कांदापातीच्या ७५ शेकडा आणि शेपूच्या २५ शेकडा जुड्यांची आवक झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसही बहुतांश भाज्यांचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

आजचे किरकोळ बाजारातील भाजीपाला दर

  • 🍅 टोमॅटो – ₹20 ते ₹30 प्रति किलो
  • 🌿 भेंडी – ₹80 ते ₹100 प्रति किलो
  • 🥒 कारले – ₹100 ते ₹120 प्रति किलो
  • 🫛 घेवडा – ₹100 ते ₹120 प्रति किलो
  • 🥒 दोडका – ₹100 ते ₹120 प्रति किलो
  • 🥒 गिलके – ₹100 ते ₹120 प्रति किलो
  • 🌱 गवार – ₹80 ते ₹100 प्रति किलो
  • 🥬 कोबी – ₹30 प्रति नग
  • 🥦 फ्लॉवर – ₹30 प्रति नग
  • 🌿 कोथिंबीर – ₹160 ते ₹210 प्रति जुडी
  • 🌱 मेथी – ₹40 ते ₹50 प्रति जुडी
  • 🧅 कांदापात – ₹40 ते ₹50 प्रति जुडी
  • 🌿 शेपू – ₹35 ते ₹80 प्रति जुडी
  • 🥬 पालक – ₹25 ते ₹30 प्रति जुडी
  • 🌿 पुदिना – ₹25 ते ₹30 प्रति जुडी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790