नाशिक: डाक विभागाची २४ ला पेन्शन अदालत, २० पर्यंत करा अर्ज

नाशिक। दि. १८ जुलै २०२६: डाक विभागातील निवृत्त कर्मचारी आणि कुटुंबीय पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी २४ जुलैला सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाक कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज २० जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन नाशिक डाकघर विभागाच्या वरिष्ठ प्रवर अधीक्षकांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटचे आमिष; महिलेची तब्बल ९.७५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

अदालतीत निवृत्तीवेतन व कुटुंबीय पेन्शनधारकांच्या प्रलंबित तक्रारींची सुनावणी होईल. पूर्णपणे कायदेशीर प्रकरणे, ई-वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगाची प्रकरणे तसेच डीपीसीच्या पुनरावलोकनाशी संबंधित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. २० जुलैनंतर प्राप्त अर्जाचा समावेश केला जाणार नाही. पेन्शन अदालतीसाठीचा अर्जाचा नमुना संबंधित टपाल कार्यालयात उपलब्ध असून, अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग, जीपीओ आवार, नाशिक -४२२००१ या पत्त्यावर सादर करावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790