नाशिक शहरातील ‘या’ विविध भागांत शनिवारी (दि. १८ जुलै) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: नाशिक शहरामधील नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या भद्रकाली विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या ११केव्ही राजे बहाद्दर विद्युत वाहिनीवर तातडीचे देखभाल दुरुस्तीचे विविध काम करण्यात येणार असल्याने, शनिवारी १८ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या वाहिनीवरील भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे… 👇

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

नाशिक शहर विभाग दोन अंतर्गत असलेल्या भगुर विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या विविध विद्युत वाहिनीवर  देखभाल दुरुस्तीची विविध कामे शनिवार १८ जुलै रोजी करण्यात  येणार आहेत. यामध्ये धाडेगांव (सकाळी १० ते संध्या. ५), धामणगाव (सकाळी ११ ते ३), एअर फोर्स, बान्सस्कूल आणि संसारी(सकाळी ११ ते १) या सर्व ११ केव्ही विद्युत वाहिन्यांवरील वीजपुरवठा दिलेल्या वेळेनुसार बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

👉 भद्रकाली विद्युत उपकेंद्र: यामध्ये मेन रोड, व्यवहारे लेन, रेडक्रॉस सिग्नल, टिळक रोड, घाणेकर लेन, वकील वाडी, एम. जी. रोड व परिसर याचा समावेश असेल.

👉 भगूर विद्युत उपकेंद्र: यामध्ये लहवीत ,लोहशिंगवे, वांजरवाडी, धामनगांव, संसारी, धाडेगाव, बान्सस्कूल, एअर फोर्स, एअर फोर्स पाणी पुरवठा, भगुर बसस्थानक जवळील परिसर या भागाचा समावेश असेल.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ व २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790