नाशिक: परिक्रमा मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत जलालपूर येथील गट क्र. 57 चे खरेदीखत पूर्ण

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने गतीने सुरू आहे. या प्रक्रियेत मौजे जलालपूर, ता. नाशिक येथील गट क्रमांक 57 मधील 0.21 हेक्टर आर क्षेत्राचे खरेदीखत श्रीमती मथुरा एन. वनसे यांच्या संमतीने यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या माध्यमातून परिक्रमा मार्गासाठी आवश्यक जमिनीची थेट खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत जमीनधारकांनी शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता यांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गट क्रमांक 57 चे खरेदीखत करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

यावेळी श्रीमती मथुरा एन. वनसे यांना भूसंपादनाचा रु. 2 कोटी 26 लाख 36 हजार 165 रूपयांचा मोबदला धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आला. या खरेदी प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

शासनाच्या महत्त्वाकांक्षी परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनास सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी श्रीमती मथुरा एन. वनसे यांचे अभिनंदन केले. जमीनधारकांच्या सकारात्मक सहभागामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत असून, सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने प्रस्तावित पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यास त्याचा मोठा हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790