नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: ४५ टक्के फॉर्मचे वाटप, ११ टक्के फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेंतर्गत १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत गृहभेटी तसेच एकाच ठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करून मतदारांकडून Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे. मतदार नोंदणी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी चार जनजागृती रिक्षांद्वारे व्यापक प्रचारही करण्यात येत असून नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती १२३ नाशिक पूर्व मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; आणखी दोन दिवस कोरड्या वातावरणाची शक्यता

नाशिक पूर्व मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने मतदारांना आवश्यक अर्ज भरणे व Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करणे अधिक सुलभ झाले आहे. या उपक्रमामुळे मोठ्या संख्येने मतदारांनी आपली नोंद अद्ययावत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ भागांत गुरुवारी (दि. १६ जुलै) वीजपुरवठा बंद राहणार…

१२३ नाशिक पूर्व मतदारसंघात एकूण ४ लाख १६ हजार ४०९ मतदार असून त्यापैकी १ लाख ८७ हजार ७० अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. हे एकूण मतदारसंख्येच्या सुमारे ४५ टक्के आहे. तसेच प्राप्त अर्जांपैकी ४३ हजार २४९ अर्जांचे डिजिटायझेशन म्हणजेच ११ टक्के काम पूर्ण झाले आहे. अर्जांचे वाटप व नोंदणी करण्याची अंतिम मुदत २९ जुलै २०२६ असून या कालावधीत मोठ्या प्रमाणात काम पूर्ण होईल, असा विश्वास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे यांनी व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790