नाशिक: अस्वच्छतेविरोधात मनपाची कडक मोहीम; सहा महिन्यांत ८,७५१ जणांवर कारवाई, ४१.२८ लाखांचा दंड वसूल

नाशिक। दि. १५ जुलै २०२६: शहरात स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कठोर कारवाईची मोहीम राबवली आहे. १ जानेवारी ते १० जुलै २०२६ या कालावधीत विविध नियमभंगाच्या ८,७५१ प्रकरणांमध्ये कारवाई करत एकूण ४१ लाख २८ हजार ८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वडाळा नाका परिसरात महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न; कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न

मनपेने दिलेल्या माहितीनुसार, ओला आणि सुका कचरा विलगीकरण न करणाऱ्या ४,०६७ प्रकरणांमध्ये १४.८८ लाख रुपये दंड आकारण्यात आला. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या १८३ जणांकडून ९.४० लाख रुपये, तर मोकळ्या जागेत बांधकामाचा मलबा टाकणाऱ्या ७९ प्रकरणांमध्ये ६.३९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बनावट देशी तूप निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; एफडीएची धडक कारवाई

याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ३,३०७ जणांविरुद्ध कारवाई करून ७.०३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे आणि जैववैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणे अशा प्रकारांवरही कारवाई करण्यात आली.

नागरिकांनी ओला-सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकबंदी तसेच स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790